Home ठळक बातम्या समाजातील वंचितांसोबत कल्याण डोंबिवली पत्रकार संघाने साजरा केला ‘पत्रकार दिन’*

समाजातील वंचितांसोबत कल्याण डोंबिवली पत्रकार संघाने साजरा केला ‘पत्रकार दिन’*

कल्याण दि.6 जानेवारी :
कल्याणात आज साजरा झालेला पत्रकार दिन हा सर्वार्थाने वेगळा आणि तितकाच संवेदनशील असा ठरला. डम्पिंग ग्राउंडवरील मुलांसोबत हा दिवस साजरा करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न कल्याण डोंबिवली पत्रकार संघाने केला. पत्रकार दिनाच्या पारंपरिक कार्यक्रम न करता त्यासाठी खर्च होणारे पैसे आर्थिक मदत म्हणून या मुलांसाठी काम करणाऱ्या अनुबंध संस्थेला देण्यात आली.

यंदाचा पत्रकार दिन नेहमीप्रमाणे साजरा न करता काही तरी वेगळं करून साजरा करण्याची सूचना सर्वच सदस्यांनी केली होती. त्यातीलच काही सदस्यांनी समाजातील वंचितांसोबत हा दिवस साजरा करण्याची संकल्पना मांडली आणि त्याला सर्वानुमते होकार मिळाला.

त्यानुसार डम्पिंग ग्राउंडशेजारील सोनवणे महाविद्यालयामध्ये अत्यंत साधेपणाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अतज्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार अण्णा बेटावदकर यांच्यासह जय महाराष्ट्रचे प्रतिनिधी आणि संघाचे कार्याध्यक्ष किशोर पगारे आणि हिंदुस्थान टाईम्सच्या प्रतिनिधी सजना नांबियार यांनी उपस्थितांशी संवाद साधला. तर डम्पिंग ग्राऊंडवर राहणाऱ्या राहुल साबळे, शिला घुले, सुमित पांजगे, महादेव घुले, गणेश या मुलांनी घरापासून ते समाजपर्यंत कराव्या लागणारी संघर्षगाथा पत्रकारांसमोर मांडली. जी ऐकून उपस्थित पत्रकारांचेही डोळे पाणावले.

या कार्यक्रमाला लोकमतचे प्रशांत माने, सचिन सागरे, झी 24 तासचे आतिश भोईर, सकाळच्या मयुरी चव्हाण – काकडे, महाराष्ट्र टाइम्सचे फोटोजर्नलिस्ट स्वप्निल शेजवळ, एलएनएन न्यूजचे केतन बेटावदकर यांच्यासह अनुबंध संस्थेचे विशाल जाधव, सूर्यकांत कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*