Home कोरोना सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी द्या – डोंबिवलीकर युवकाची...

सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी द्या – डोंबिवलीकर युवकाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 

डोंबिवली दि.5 सप्टेंबर :
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक लोकांचे लसीकरण हेच सर्वात प्रभावी शस्त्र असल्याचे आतापर्यंतच्या परिस्थितीवरून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सर्वात मोठा लोकोत्सव असणाऱ्या गणेशोत्सवाच्या माध्यमातून अधिकाधिक लोकांचे लसीकरण करता येऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी डोंबिवलीकर युवकाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

महाराष्ट्र आणि गणेशोत्सवाचे अतूट असे नाते आहे. स्वातंत्र्यप्राप्तीच्या धगधगत्या ज्वालेतूनच सार्वजनिक गणेशोत्सवाचा श्रीगणेशा झाला होता. त्यामूळे आता कोरोनाच्या जोखडातून लोकांची सुटका करण्यामध्ये हा लोकोत्सव महत्वाची भूमिका बजावू शकतो. अद्यापही अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. हा विचार करता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना गणेश मंडपाशेजारी लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी युवासेनेचे पदाधिकारी अनमोल म्हात्रे यांनी केली आहे.

प्रत्येक प्रभागा प्रभागात गणेश मंडळाचे काम असते. त्यामुळे गणेश उत्सव मंडळांना लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी मिळाली तर मोठ्या लोकसंख्येचे लसीकरण होऊन भविष्यात येणाऱ्या तिसऱ्या लाटेला थोपवण्यायत मोठी मदत होईल असा विश्वासही म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे. यासाठी महानगरपालिकेने लससाठा उपलब्ध करून दिल्यास शासनाच्या 100 टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यात मोठा हातभार लागू शकणार आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा