Home Uncategorised दहिसर गावात शिवसेनेनं लोकवर्गणीतून उभारली पोस्टाची इमारत

दहिसर गावात शिवसेनेनं लोकवर्गणीतून उभारली पोस्टाची इमारत

 

डोंबिवली दि.29 ऑक्टोबर :

भारतीय पोस्ट खात्याच्या दहिसर कार्यालयाचे सोमवारी उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागात दिवसेंदिवस पोस्टाची सुविधा ही वेळेवर होत नसताना आता दहिसर येथिल पोस्ट कार्यालय नागरिकांसाठी खुला करण्यात आले आहे. मागील काही वर्षांपासून दहिसर पोस्टाच्या कार्यालयाची इमारत अत्यंत जीर्ण झाली होती. त्यासाठी शिवसेनेने नवीन इमारत तयार करण्यासाठी पोस्ट कार्यालय आम्ही लोकवर्गणीतून करत असल्याचे सांगितले होते. त्यानुसार पोस्ट खात्याकडे करण्यात आलेली मागणीही मंजूर करण्यात आली.

पावसाळ्यात पोस्टाच्या कार्यालयात पावसाचे पाणी, साप , जनावरें जात असल्याने कर्मचारी आणि नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. अखेर लोकवर्गणी गोळा करून शिवसेनेने शाखेचे मागे नव्या कार्यालयाचे काम सुरू केले. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयीचे गांभिर्य लक्षात घेऊन युवा सेनेचे शाखा अधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील यांच्या पुढाकाराने ह्या इमारतीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. या इमारतीचे उद्घाटन शीळ डायघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंगेश सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला भारतीय पोस्ट कार्यालयाचे अधिकारी डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य भरत भोईर तसेच शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*