Home ठळक बातम्या पोटे ट्युटोरियलची यशस्वी घोडदौड कायम; ४० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा तर १६१ जणांना...

पोटे ट्युटोरियलची यशस्वी घोडदौड कायम; ४० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा तर १६१ जणांना ८० टक्क्यांहून अधिक गुण

कल्याण दि. २१ जून :

कल्याणातील एक नामांकित शिक्षण संस्था असणाऱ्या पोटे ग्रुपच्या पोटे ट्युटोरियलने यंदाच्या दहावीच्या परीक्षेतही आपली यशस्वी घोडदौड कायम राखली आहे. ज्यामध्ये दोघा विद्यार्थिनींनी अनुक्रमे तब्बल ९८ आणि ९६ तर एका विद्यार्थ्याला ९५ टक्के गुण मिळवत आपला नावलौकिक कायम राखला आहे.

गेल्या २० वर्षांपासून पोटे ट्युटोरियल कोचिंग क्लासच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रगतीची नवी आणि योग्य दिशा दाखवण्याचे काम करत आहे. पोटे ग्रुपचे सीएमडी बिपिन पोटे यांचे अत्यंत उत्कृष्ट आणि कौशल्यपूर्ण मार्गदर्शन आणि तितकाच चांगला शिक्षक वर्ग आणि या सर्वांना तितक्याच प्रभावीपणे प्रतिसाद देणार विद्यार्थी हे पोटे ट्युटोरियलच्या या घवघवीत यशाचे बलस्थान म्हणावे लागेल. त्यामुळेच गेल्या दोन दशकांपासून दहावीच्या निकालावर पोटे ट्युटोरियलचा दबदबा कायम आहे.

यंदाच्या निकालामध्ये ३ जणांना ९५ टक्क्यांपेक्षा अधिक, ४० जणांना ९० टक्क्यांपेक्षा अधिक तर १६१ विद्यार्थ्यांना ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. पोटे ट्युटोरियलच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल सर्वांकडून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा