Home कोरोना क्या बात है : 8 वीच्या विद्यार्थ्यांना कल्याणातील ही संस्था वर्षभर शिकवणार...

क्या बात है : 8 वीच्या विद्यार्थ्यांना कल्याणातील ही संस्था वर्षभर शिकवणार ‘मोफत’

भरावे लागणार केवळ ऑनलाईन मिटिंगचे शुल्क

कल्याण दि.10 ऑगस्ट :
गेल्या दोन दशकांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणारा पोटे ग्रुप ऑफ एज्युकेशन ही संस्था दर्जेदार शिक्षणाबरोबरच आपल्या सामाजिक बांधिलकीसाठीही ओळखली जाते. वेळोवेळी विविध उदाहरणांवरून या संस्थेने आपली सामाजिक जाणिव जपल्याचे दिसून आले आहे. कोरोनानंतर आलेल्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून पोटे ग्रुपने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. क्लास लावण्याची इच्छा असूनही केवळ आर्थिक परिस्थितीमुळे लावू न शकणाऱ्या 8 वीच्या विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईनचे शुल्क भरून उर्वरित शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

सेमी इंग्रजी माध्यमामध्ये 8 वी इयत्ता म्हणजे माध्यमिक शिक्षणाचा पाया समजला जातो. 8 व्या इयत्तेपासूनच विद्यार्थ्यांची खऱ्या अर्थाने भविष्यातील वाटचालीची आखणी होत असते. मात्र गेल्या दिड पावणे दोन वर्षांपासून आलेल्या कोवीडने इतर क्षेत्रांप्रमाणे शिक्षण क्षेत्रही ढवळून निघाले आहे. तर कोवीडमूळे आरोग्यासोबतच लोकांच्या आर्थिक स्थितीवरही मोठा परिणाम झाला आहे. नेमका हाच विचार डोळ्यासमोर ठेऊन पोटे ग्रुपने सेमी इंग्रजीच्या 8 व्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना मोफत शिकवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेत समाजाप्रती असणारी बांधिलकी अधोरेखित केली आहे.
पोटे ट्युटोरियलच्या या निर्णयानुसार सेमी इंग्रजीच्या 8 व्या इयत्तेतील विद्यार्थ्यांना केवळ ऑनलाईनचा 2 हजार रुपयांचा खर्च भरून संपूर्ण वर्षभराचा क्लास मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे. केवळ पैशांअभावी मुलांचे शिक्षण थांबू नये आणि त्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध व्हावे हाच या निर्णयामागचा प्रमूख हेतू असल्याची माहिती पोटे ग्रुपचे सीएमडी आणि शिक्षण अभ्यासक बिपीन पोटे यांनी दिली.
अधिक माहितीसाठी संपर्क – खडकपाडा 86910 37005 / बिर्ला कॉलेज 8691037006 / कल्याण पूर्व 93215 19728

मागील लेखकेडीएमसी क्षेत्रात उद्या (10 ऑगस्ट) 2 ठिकाणी लसीकरण; कोव्हीशिल्डचा केवळ 2 रा डोस मिळणार
पुढील लेखआधारवाडी जेलमधील स्वच्छतागृहात आढळल्या मोबाईलसह अनेक संशयास्पद वस्तू ; अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा