Home ठळक बातम्या अपयश कसे पचवायचे हे मुलांना शिकवण्याची खरी गरज – बिपीन पोटे

अपयश कसे पचवायचे हे मुलांना शिकवण्याची खरी गरज – बिपीन पोटे

कल्याण दि.10 मार्च :
अपयश मग ते शिक्षणातील असो, परीक्षेतील असो की नातेसंबंधातील. सध्याची परिस्थिती पाहता हे अपयश कसे पचवायचे हे येणाऱ्या काळात आपल्याला मुलांना शिकवावे लागेल असे परखड मत सुप्रसिद्ध शिक्षण अभ्यासक आणि पोटे ग्रुपचे सीएमडी बिपीन पोटे यांनी व्यक्त केले. पोटे ट्युटोरिअलतर्फे ‘अनिश्चित काळातील विद्यार्थ्यांचे भवितव्य’ या विषयावर केम्ब्रिआ इंटरनॅशनल शाळेच्या सभागृहात आयोजित परिसंवादात ते बोलत होते.

भविष्यातील शैक्षणिक, रोजगार क्षेत्रातील किंवा व्यावसायिक क्षेत्रात होणाऱ्या बदलांबाबत आपण जागरूक असणे आवश्यक आहे. आपल्या मुलांच्या विकासासाठी आपण तसा दृष्टीकोन ठेवून होणाऱ्या बदलांसाठी मुलांना तयार केले पाहिजे. मोबाईल, इंटरनेट, टीव्ही, गेम्स आदी लक्ष विचलित करणाऱ्या चक्रव्ह्यूहात आपल्या मुलांचा अभिमन्यू झाला आहे. एकीकडे आपण मुलांना सांगतोय की मोबाईल , इंटरनेट वापरू नका. परंतु येत्या काळात त्याच्या आधारावर व्यवसाय-रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत असे बिपीन पोटे यांनी सांगितले.

तर घरात आज सगळ्यात जास्त कशाची हत्या होत असेल तर ती मुलांमधील कुतूहलाची. आपण पालक वर्ग पावलो पावली त्यांच्यातील कुतुहलतेला मारक असे कृत्य करीत आहोत. मात्र भविष्याची गरज पाहता मुलांना नवनविन गोष्टी, कौशल्य सतत शिकत राहावे लागणार आहे. त्यासाठी आपल्याला मुलाकडून नेमकं काय हवं आहे? याची माहिती असणे आवश्यक आहे. त्याचजोडीला 21 व्या शतकातील पालकांकडे संयम आणि सहयोगाचे महत्वदेखील समजले पाहिजे असे मत पोटे यांनी यावेळी व्यक्त केले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*