Home ठळक बातम्या कल्याण पूर्वेच्या चेतना शाळा परिसरात काल रात्रीपासून वीज पुरवठा खंडीत; नागरिक हैराण

कल्याण पूर्वेच्या चेतना शाळा परिसरात काल रात्रीपासून वीज पुरवठा खंडीत; नागरिक हैराण

कल्याण दि.7 ऑक्टोबर :
कल्याण पूर्वेच्या चेतना शाळा परिसरात काल रात्रीपासून वीज पुरवठा खंडीत झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. वीज पुरवठा खंडीत होऊन आता 24 तासांपेक्षा जास्त कालावधी उलटूनही वीज नसल्याने रहिवासी प्रचंड हैराण झाले आहेत. त्यातही विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांचे जास्त हाल होत असल्याचे सांगण्यात आले. तर वीज पुरवठा खंडित झाल्याबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे मिळत असल्याची माहितीही स्थानिकांनी दिली आहे. काल (बुधवारी) संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्वेत विविध ठिकाणांचा वीजपुरवठा खंडीत झाला. तो पूर्ववत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी कालपासून काम करत असल्याची माहिती कल्याण पूर्व विभागाचे महावितरण अधिकारी नरेंद्र धवल यांनी दुपारच्या सुमारास एलएनएनला दिली आहे.

*फोटो – माहिती सौजन्य :- एलएनएन सिटीजन रिपोर्टर*

*#LNN*
*#LocalNewsNetwork*

मागील लेखकेडीएमसीतर्फे कल्याण डोंबिवलीत उद्या (8 ऑक्टोबर) 34 ठिकाणी लसीकरण
पुढील लेखअट्टल मोबाईल स्नॅचरला मानपाडा पोलिसांकडून बेड्या; चोरीचे 31 मोबाईल हस्तगत

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा