Home ठळक बातम्या देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी उद्या १२ मे रोजी कल्याण पश्चिमेच्या या भागात वीजपुरवठा बंद

देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी उद्या १२ मे रोजी कल्याण पश्चिमेच्या या भागात वीजपुरवठा बंद

 

कल्याण दि.११ मे :
वीज वितरण यंत्रणेच्या नियोजित आणि पावसाळापूर्व देखभाल- दुरुस्तीच्या कामासाठी कल्याण पश्चिम विभागातील काही भागाचा वीजपुरवठा गुरुवारी १२ मे २०२२ काही काळ बंद ठेवण्यात येणार आहे. या भागातील वीज ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर संदेशाद्वारे पूर्वसुचना देण्यात आली असून याची नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

२२ केव्ही दुर्गाडी उपकेंद्रातून निघणाऱ्या आधारवाडी फिडरवरील सोनावणे कॉलेज, वाडेकर सर्कल, साईबाबा मंदिर, अन्नपुर्णा नगर, जेलरोड तर सहजानंद चौक फिडरवरील मोहिंदरसिंग काबुलसिंग, ठाणकरपाडा, दुर्गानगर, मानससरोवर, सुंदरनगर, महाराष्ट्र नगर, आग्रा रोड फिडरवरील आग्रा रोड, भारताचार्य चौक, लाल चौकी, पारनाका, नमस्कार मंडळ, बंदर रोड फिडरवरील रेतीबंदर, मिठबंदर, व्हाईट हाऊस, मौलवी कंपाऊंड, गोविंदवाडी, कोळी वाडा आदी भागाचा वीज पुरवठा उद्या गुरुवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

तसेच संबंधित भागाचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरुपात इतर वाहिन्यांवरून सुरू ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तर वाडेघर फिडरवरील आनंदसागर, डीबी चौक, श्री कॉम्लेक्स मेहरनगर, डॉन बॉस्को शाळा, वाडेघर, साई शरण आदी भागांचा वीजपुरवठा सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहणार असल्याची माहिती महावितरणतर्फे देण्यात आली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा