Home कोरोना ‘फ्रंटलाईन वर्कर दर्जा’च्या मागणीसाठी वीज कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

‘फ्रंटलाईन वर्कर दर्जा’च्या मागणीसाठी वीज कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

 

कल्याण-डोंबिवली दि.24 मे :
फ्रंटलाईन वर्करचा दर्जा मिळण्याच्या मागणीसाठी महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती वीज कंपनीच्या कामगारांनी आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. यामध्ये कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांसह तिन्ही वीज कंपन्यांमधील कंत्राटी कर्मचारीही सहभागी झाले आहेत.
वीज कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन शासकीय लाभ मिळावेत, वीज कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांनाही लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे, कोरोनाबाधित कंत्राटी कर्मचाऱ्याला 30 ऐवजी 50 लाखांचे सानुग्रह अनुदान मिळावे, कोवीडचा उद्रेक पाहता वीज बिल वसुलीची सक्ती करू नये आदी प्रमूख मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू झाले आहे. ज्यामध्ये वीज कंत्राटी कामगार संघासह कायम कामगारस्वरूपी कर्मचारी-अभियंता संघटनेच्या कृती समितीही सहभागी झाली आहे.

या आंदोलनादरम्यान वीज ग्राहकांचा विशेषतः कोवीड हॉस्पिटलचा वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घेतली जाणार असून उर्वरित कोणतीही कामे केली जाणार नसल्याचेही वीज कंत्राटी कामगार संघटनेच्या मनोज मनुचारी यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा