Home ठळक बातम्या रमजान ईदनिमित्त कल्याणात हजारो मुस्लीम बांधवांचे नमाज पठण  

रमजान ईदनिमित्त कल्याणात हजारो मुस्लीम बांधवांचे नमाज पठण  

रमजान ईदनिमित्त कल्याणात हजारो मुस्लीम बांधवांचे नमाज पठण

कल्याण दि.३ मे :
आज असलेल्या रमजान ईदनिमित्त कल्याणच्या दुर्गाडी किल्ला परिसरात हजारो मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. समाजात शांतता आणि अखंडता कायम राहण्याची प्रार्थना केल्याचे यावेळी मुस्लिम बांधवांकडून सांगण्यात आले.

कोवीडमूळे गेली २ वर्षे इतर धर्मियांप्रमाणे मुस्लिम बांधवांनाही सार्वजनिकरित्या सणवार साजरे करता आले नव्हते. मात्र यंदा कोवीडचे सर्वच निर्बंध मागे घेण्यात आल्याने मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.

दुर्गाडी किल्ला परिसरात आज सकाळी एकच उत्साह दिसून आला. सकाळी हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव या परिसरात जमा झाले होते. यावेळी मुस्लिम बांधवांनी नमाज पठण करत एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.

दरम्यान यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दुर्गाडी परिसरासह प्रमुख चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मागील लेखआकर्षक रोषणाईने फुलले छ्त्रपती शिवाजी महाराज चौकाचे सौंदर्य
पुढील लेखकल्याणात आज भोंग्यविनाच अजान ; पोलीस प्रशासनाकडून शांततेचे आवाहन

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा