Home ठळक बातम्या सौरऊर्जेच्या वापरासाठी केडीएमसी विद्युत विभागाकडून पथनाट्याद्वारे जनजागृती

सौरऊर्जेच्या वापरासाठी केडीएमसी विद्युत विभागाकडून पथनाट्याद्वारे जनजागृती

 

डोंबिवली दि.२७ एप्रिल:

सौरऊर्जा आणि त्याच्या वापराविषयी नागरिकांमध्ये माहिती होण्यासाठी कल्याण डोंबिवली महानगपालिकेच्या विद्युत विभागातर्फे गेल्या वर्षीपासून पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून सौरऊर्जेच्या प्रचार- प्रसारासाठी विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवलीत इंदिरा गांधी चौकात पथनाट्य सादर केले.

देशातील 70 टक्के वीज निर्मिती ही कोळशावर आधारित होत आहे. मात्र आता जगाच्या पाठीवर कोळशाचे आयुष्य पुढील अवघे ९ दशकांचे उरले असून त्यानंतर हे कोळशाचे साठे संपुष्टात येणार आहेत. परिणामी याला सर्वोत्तम नैसर्गिक पर्याय म्हणून सौर ऊर्जेचा वापर मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे. भारताला सौर ऊर्जेचे मोठे वरदान असून त्याचा वापर ही काळाची गरज असल्याचा संदेश या पथनाट्यांतून दिला जात आहे. कल्याण डोंबिवलीत आतापर्यंत अनेक सार्वजनिक ठिकाणी केडीएमसी विद्युत विभागातर्फे ही पथनाट्ये सादर करण्यात आली आहेत. आज डोंबिवलीत सादर झालेला हा पथनाट्याचा २६ वा प्रयोग असून येत्या काळात अशी १०० पथनाट्ये सादर करण्याचा मानस विद्युत विभागातर्फे व्यक्त करण्यात आला.

सौरऊर्जा ही शुद्ध आणि पर्यावरण पूरक ऊर्जा असून नागरिकांनी त्याचा अधिकाधिक वापर करावा. आज आपल्या शहरात भेडसावणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येवरही सौर ऊर्जा हा अतिशय उपयुक्त तोडगा आहे. त्यामुळेच कल्याण डोंबिवलीसह देशाच्या पर्यावरण संवर्धन करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर करण्याचे आवाहन विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत यांनी यावेळी केले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा