Home Uncategorised डोंबिवलीत भरलं आहे प्लॅस्टिकमय सृष्टीसह ‘पुणेरी पाट्यां’चे अनोखे प्रदर्शन

डोंबिवलीत भरलं आहे प्लॅस्टिकमय सृष्टीसह ‘पुणेरी पाट्यां’चे अनोखे प्रदर्शन

 

डोंबिवली दि.30 जानेवारी :
सरकारने प्लॅस्टिक बंदी लागू करूनही अद्याप बऱ्याच ठिकाणी त्याचा वापर सुरू आहे. प्लॅस्टिकचे दुष्परिणाम आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी उद्योजक संतोष डावखर आणि त्यांच्या टीमने डोंबिवलीत एक अनोखे प्रदर्शन आयोजित केले आहे. डोंबिवली पूर्वेच्या गोळवली येथील रिजेन्सी अनंतममध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

या प्रदर्शनाच्या माध्यमातून आणि स्पर्धेतून विद्यार्थ्यांना प्लॅस्टिक संकट व त्याचे दुष्परिणाम, प्लॅस्टिकचा नैसर्गिक अन्नसाखळीवर, पर्यावरण मानवी जीवनावर होणार परिणाम त्यावर करता येणाऱ्या उपायोजना आदींबाबत प्रदर्शनात माहिती लावण्यात आली आहे. तर त्याच जोडीला एक कुतूहल म्हणून या प्रदर्शनात विविधांगी संदेश देणाऱ्या अस्सल पुणेरी पाट्याही मांडण्यात आला आहेत. पुणेकर आणि त्यांच्या हटके अशा पुणेरी पाट्या हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. या एकाहून एक सरस अशा पुणेरी पाट्यांवरील संदेशही या प्रदर्शनात पाहायला मिळणार असल्याची माहिती आयोजक संतोष डावखर यांनी दिली. आज आणि उद्या असे दोन दिवस सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे.

 

तसेच विजेता ठरणाऱ्या शिक्षक,विदार्थी व शाळांना ७५ हजार रुपये रोख रक्कम व पारितोषिक विशेष प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरवण्यात येणार आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी कल्याण, डोंबिवली, दिवा, भिवंडी आदी परिसरातील तब्बल 100 शाळांचे विद्यार्थी येणार असून त्यांच्या येण्या- जाण्याची व्यवस्था आयोजकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*