Home ठळक बातम्या राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे डोंबिवली मनसेकडून अनोख्या पध्दतीने सेलिब्रेशन

राज ठाकरेंच्या वाढदिवसाचे डोंबिवली मनसेकडून अनोख्या पध्दतीने सेलिब्रेशन

डोंबिवली दि.14 जून :
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आज असणाऱ्या ५३ व्या वाढदिवसानिमित्त आमदार राजु पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली शहर मनसेतर्फे नागरीकांना विविध फुलझाडांचे मोफत वाटप करण्यात आले. 53 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 1 हजार 53 फुलझाडांचे वाटप करण्यात आले.

गेले दिड वर्ष कोरोनासारख्या महामारीने संपुर्ण जग त्रासलेले असून हळुहळु जनजीवन पुर्वपदावर येत आहे. सामान्य लोकांचे जीवन उत्साहाने भारलेले, टवटवीत, सुगंधी आणि रंगीबेरंगी व्हावं यासाठी गुलाब, मोगरा, जास्वंद अशी मनमोहक फुलझाडांचे वाटप करून नैराश्य-मरगळ दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे मनसे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांनी सांगितले.

दरम्यान डोंबिवलीकर नागरीकांनीही या उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. अवघ्या तासाभरात तब्बल 1हजार रोपांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी मनसे शहरसंघटक योगेश रोहिदास पाटील यांनी विशेष सहकार्य केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, प्रकाश माने, दिपीका पेडणेकर, कोमल पाटील, स्वप्ना पाटील, ज्योती खवसकर, मिलींद म्हात्रे, दिपक शिंदे, संदिप म्हात्रे, रविंद्र गरुड, सुहास काळे, दिप्तेश नाईक, रमेश यादव, प्रदिप बावसकर, परेश भोईर, प्रेम पाटील, उदय वेळासकर आदी मनसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

मागील लेखकचराच उचलला न गेल्याने मच्छी मार्केटमध्ये पसरल्या आळ्या ; व्यावसायिक आणि ग्राहकांचे आरोग्य धोक्यात
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 88 रुग्ण तर 154 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा