Home Uncategorised राममंदिराच्या मागणीसाठी कल्याणात निघाली ‘जागर दिंडी’

राममंदिराच्या मागणीसाठी कल्याणात निघाली ‘जागर दिंडी’

 

कल्याण दि.10 जाानेवारी :

केंद्र शासनाने कोणत्याही प्रकारचा विलंब न करता संसदेत कायदा करून राममंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करावा. या मागणीसाठी आज कल्याण येथे विविध हिंदुत्वनिष्ट संघटनांच्या माध्यामातून नामदिंडी काढून रामनामाचा जागर करण्यात आला.

या नामदिंडीची सुरवात कल्याण पश्चिम येथे असलेल्या दत्तमंदिराकडून करण्यात आली. पुढे ही दिंडी ए.सी.पी. कार्यालय, लक्ष्मी मार्केट मार्ग येथून जाऊन शिवाजी महाराज चौक, टिळक चौक मार्गे पारनाका येथील श्रीराम मंदिराजवळ आरती करून सांगता झाली. या नामदिंडीत श्रीराम हिंदू संघटना, योग वेदांत समिती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती आदि संघटना सहभागी झाल्या होत्या.

यावेळी करण्यात आलेल्या मागण्या –

१. संसदेत हिंदूंनी दिलेल्या बहुमताच्या आधारे श्रीराममंदिर उभारणी संदर्भातील कायदा बनवून त्याच्या आधारे अयोध्येत भव्य राममंदिर उभारण्यास प्रारंभ करावा.

२. सध्या श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामाची मूर्ती एका कापडी तंबूत ठेवून तिची एकप्रकारे विटंबनाच केली जात आहे. या ठिकाणी भाविकांना कोणत्याही प्रकारे पूजा-अर्चा करता येत नाही. हे टाळण्यासाठी भव्य श्रीराम मंदिर उभारण्यापूर्वी जवळच एक तात्पुरते लहान मंदिर बांधावे, तेथे श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी आणि हिंदूंना विधीवत पूर्जा-अर्चा, धार्मिक विधी करण्यासाठी सोय उपलब्ध करून द्यावी.

३. जोवर वरील मागण्या पूर्ण होत नाहीत, तोवर श्रीरामजन्मभूमीवर श्रीरामाची विधीवत पूजा करण्यास हिंदूंना कायमस्वरूपी विशेष अनुमती द्यावी.

४. सध्या या ठिकाणी असलेल्या श्रीरामाच्या मूर्तीजवळ जाण्यासाठी अनेक ‘मेटल डिटेक्टर’ असून कोणतीही वस्तू तेथे नेण्यास बंदी आहे. तपासणी पूर्ण करून सर्व प्रकारचे पूजा आणि विधी यांसाठीचे साहित्य नेण्यासाठी अनुमती देण्यात यावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*