Home ठळक बातम्या ‘रंगीलो नवरात्री’… समारोप एका आनंद सोहळ्याचा

‘रंगीलो नवरात्री’… समारोप एका आनंद सोहळ्याचा

कल्याण दि.19 ऑक्टोबर :
‘रंगीलो नवरात्री’… कल्याणात आतापर्यंत झालेल्या गरबोत्सवातील सर्वात सुपरहिट गरबोत्सव. गेले 9 दिवस सुरू असणाऱ्या या आनंद सोहळ्याचा समारोपही काल तितक्याच दणक्यात संपन्न झाला.

सामाजिक कार्यकर्ते विकी गणात्रा आणि महेंद्र जैन यांच्या ग्रुपने एकत्र येत यंदा प्रथमच ‘रंगीलो नवरात्र’चे आयोजन केले होते. येथील मेट्रो मॉलमधील बॉलरूम पलाझोचा प्रशस्त हॉलही ‘रंगीलो’ला कमी पडला. यावरूनच गरबाप्रेमी आणि कल्याणकरांनी त्याला दिलेल्या भरभरून प्रतिसादाचा अंदाज येऊ शकतो. रंगीलोच्या पहिल्या दिवसापासून गरबाप्रेमींवर चढलेला गरबाफिव्हर शेवटच्या दिवसापर्यंत कायम असल्याचेच दिसून आले. म्हणूनच तर गरबा खेळण्यासाठी युवक युवतींच्या मोठ्या संख्येबरोबरच सहकुटुंब येणाऱ्या गरबाप्रेमींची संख्याही लक्षणीय होती.

अत्यंत उत्कृष्ट नियोजन, दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम आणि त्याजोडीला सुरक्षित वातावरण यामुळे रंगीलोने गरबाप्रेमींवर आपल्या पसंतीची मोहोर उमटवली. विशेष म्हणजे गरबा खेळण्यासाठी पारंपरिक पोशाखात आलेल्या गरबा प्रेमींची संख्याही मोठी होती. मैत्री ग्रुप, जैन सोशल ग्रुप यांसारख्या अनेक सामाजिक संस्थांनीही या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेत रंगीलोचे तोंडभरून कौतुक केले. तसेच खासदार कपिल पाटील, डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार गणपत गायकवाड, नरेंद्र पवार यांच्यासह अनेक दिग्गजांनीही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थिती दर्शवली.

गेले 9 दिवस सुरू असणाऱ्या या आनंद सोहळ्याचा समारोपही काल तितक्याच शानदारपणे करण्यात आला. नेहमीप्रमाणे कालही गरबाप्रेमींना विविध बक्षिसांनी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले. तर कल्याणकर गरबाप्रेमींसाठी अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आयोजक विकी गणात्रा, महेंद्र जैन, विमल ठक्कर, हेमांगी संघवी, महेंद्र मुनोत, जय ठक्कर, दर्शन जैन, लवली नविन जैन, श्रीकांत शेट्टी, भरत शंकलेशा आदींचे कौतुक करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*