Home ठळक बातम्या कल्याणात आढळले दुर्मिळ प्राच्य शिंगाळा घुबड ; पक्षी मित्राने दिले जीवदान

कल्याणात आढळले दुर्मिळ प्राच्य शिंगाळा घुबड ; पक्षी मित्राने दिले जीवदान

कल्याण दि.25 फेब्रुवारी :

कल्याण पश्चिमेला दुर्मिळ प्राच्य शिंगाळा घुबड आढळून आला असून त्याला पक्षी मित्राकडून जीवदान देण्यात आले आहे. पतंगाच्या मांज्यामध्ये तो अडकून पडला होता. (Rare Oriental scops Owl found in Kalyan; A bird friend gave his life)

आज सकाळच्या सुमारास गांधारी परिसरात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना एक पक्षी पतंगाच्या मांज्यात अडकल्याचे दिसून आल्याने महापालिका सचिव संजय जाधव यांनी पक्षीमित्र महेश बनकर यांना याबाबत माहिती दिली. महेश बनकर यांनीही मग तातडीने गांधारी परिसरात धाव घेत पतंगाच्या मांज्यात अकडलेल्या या पक्ष्याला सोडवले.

हा पक्षी घुबडांच्या प्रजातीतील प्राच्य घुबड (Oriental Scops Owl) असून हा एक दुर्मिळ पक्षी असल्याची माहिती पक्षीमित्र महेश बनकर यांनी दिली. बरेच तास मांज्यामध्ये अडकून पडल्याने आणि उन्हामुळे त्याच्या शरीरातील पाणी कमी झाले होते. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर असून आज रात्री त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार असल्याचे बनकर यांनी सांगितले.

अशी आहे या पक्ष्याची खासियत…

या पक्ष्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. हा पक्षी आकाराने इतर घुबडांपेक्षा काहीसा लहान असून गडद पिवळे डोळे आणि गडद तपकिरी रंगाचे पंख अशी त्याची खासियत आहे. हा पक्षी पूर्व आणि दक्षिण आशियात सर्वाधिक आढळून येतात.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा