Home ठळक बातम्या केडीएमटीतील परिवहन कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी रवी पाटील

केडीएमटीतील परिवहन कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी रवी पाटील

 

कल्याण दि.3 ऑक्टोबर :
कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमातील परिवहन कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी रवी पाटील यांची निवड करण्यात आली. ज्येष्ठ नगरसेवक प्रकाश (नाना) पेणकर यांच्या आकस्मिक निधनामुळे अध्यक्ष पदाबाबत झालेल्या कार्यकारिणी सदस्य बैठकीत सर्वानुमते रवी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. तर प्रकाश पेणकर यांचे चिरंजीव प्रतिक प्रकाश पेणकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
दरम्यान परिवहन कर्मचारी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांचे अपुर्ण प्रश्न प्रशासनास विश्वासात घेवूनच लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू असा विश्वास नवनिर्वाचित अध्यक्ष पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 71 रुग्ण तर 71 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकेडीएमसीतर्फे कल्याण डोंबिवलीत उद्या (4 ऑक्टोबर) 4 ठिकाणी लसीकरण

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा