Site icon LNN

ठाणे जिल्ह्यासाठी आजपासून 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट ; सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन

 

ठाणे दि.18 ऑगस्ट :
हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठी आजपासून पुढील दोन दिवसांसाठी पावसाचा (सोमवार 18 ऑगस्ट आणि मंगळवार 19 ऑगस्ट 2025)रेड अलर्ट जाहीर केला आहे. या कालावधीत अतिवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आला असून प्रशासनाने नागरिकांना पुरेशी काळजी घेण्याचे आणि आवश्यकता नसल्यास शक्यतो घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ठाणे जिल्ह्यात येत्या 48 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नदी-नाले, खाड्या आणि सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन आणि महानगरपालिकांकडून आपत्कालीन पथके सतर्कतेवर ठेवण्यात आली आहेत. नागरिकांनाही धोकादायक स्थळांवर जाणे टाळावे, वीज उपकरणांचा वापर काळजीपूर्वक करावा, तसेच प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोर पालन करायचे आवाहन करण्यात आले आहे.

अतिवृष्टीच्या इशाऱ्यावर एनडीआरएफ आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनाही सतर्क करण्यात आले असून, आवश्यकतेनुसार तातडीने मदत आणि बचावकार्य हाती घेण्यात येईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

दरम्यान आज आणि उद्या शाळा – महाविद्यालये सुरू ठेवण्याबाबत जिल्हा प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली असून सध्या प्रशासकीय स्तरावर परिस्थितीचा आढावा घेण्यात येत आहे.

Exit mobile version