Site icon LNN

धार्मिकता, वैचारिकतेसोबतच आज हिंदू समाज राजकीयदृष्ट्याही एकवटलाय – अभयराजे जगताप

कल्याणच्या बेतुरकर पाडा वस्तीमध्ये झाले सकल हिंदू समाज संमेलन

कल्याण | ४ मे :
श्रीराम मंदिराच्या आंदोलनानंतर देशातील सर्व हिंदू समाज एकवटायला सुरुवात झाली असून आज केवळ धार्मिक आणि वैचारिकरित्या नव्हे तर राजकीयदृष्ट्याही एकवटला असल्याचे प्रतिपादन शिवशंभो मंचाचे प्रांत संयोजक अभयराजे जगताप यांनी कल्याणात केले. सकल हिंदू समाजातर्फे कल्याण पश्चिमेतील स्वानंद नगर मैदानात झालेल्या सकल हिंदू समाज संमेलनात ते बोलत होते. (Religious unity, ideological strength, and now political consolidation — the Hindu community stands united: Abhayraje Jagtap)

पूर्वी देशाच्या इतर राज्यांमध्ये काय सुरू आहे, काश्मीरमध्ये काय होतंय, दक्षिणेत काय होतंय, बंगालमध्ये काय होतंय या वैचारिकतेमध्ये अडकून पडला होता. मात्र जसे श्रीराम मंदिराचे आंदोलन सुरू झाले आणि हळूहळू देशातील सर्व हिंदू एकत्र यायला सुरुवात झाली. त्याची परिणीती म्हणजे पश्चिम बंगालच्या निकालाकडे आज संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असून बंगालचा बांगलादेश होऊ नये यासाठी भाजपने संपूर्ण राजकीय ताकद पणाला लावली आहे. तर पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येण्यासाठी कित्येक जण देव पाण्यात बुडवून बसले असल्याचे आज सकारात्मक चित्र दिसत असून देशातील आजचा हिंदू समाज हा आता बदललेला असल्याचे अभयराजे जगताप यांनी यावेळी सांगितले.

आपल्या हिंदू संस्कृतीचा पराक्रमी इतिहास आपण जाणून घेतला तर आपल्याला असे जाणवेल की एकीकडे अफगाणिस्तानमधील कंदहार (महाभारतातील गंधार) पासून ते शेजारील आताचा म्यानमार आणि प्राचीन काळातील ब्रह्मदेश हेदेखील आपल्या अखंड हिंदुस्थानचा भाग होता. मात्र जिथे जिथे आपली लोकसंख्या कमी झाली तो तो प्रदेश आपल्या देशापासून तुटत गेल्याचे सांगत आज ‘जिहाद’ हा केवळ आपल्या देशासमोरील नव्हे तर संपूर्ण जगासमोरील मोठी समस्या निर्माण झाल्याचे जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले.

कारण गेल्या काही शतकांमध्ये झालेल्या इस्लामिक आक्रमणांमुळे जगभरातील ग्रीक, रोमन, युनानी, पर्शिया अशा अनेक मोठमोठ्या संस्कृती नष्ट झाल्या. मात्र आपली हिंदू संस्कृती ही शेकडो वर्षांच्या परकीय आक्रमणानंतरही तितक्याच ताकदीने उभे आहोत. मात्र सध्याची देशातील परिस्थिती पाहता आपण अजिबात गाफील राहून चालणार नाही. कारण आज केवळ लव्ह जिहाद नाहीये तर लँड जिहाद, थुंकी जिहाद, कॉर्पोरेट जिहाद अशा विविध मार्गांनी आपल्याला अडचणीत आणण्याचे काम सुरू असून हिंदू समाजाने या सर्वांबाबत जागरूक राहण्याचे आवाहन अभय राजे जगताप यांनी यावेळी केले.

या सकल हिंदू समाज संमेलनाला स्थानिक भाजप नगरसेविका हेमलता नरेंद्र पवार, नगरसेवक शामल गायकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी विवेकानंद शाखेचे प्रमूख ऋषिकेश केळकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीची उपस्थिताना ओळख दिली.

Exit mobile version