Home ठळक बातम्या कल्याण रेल्वे स्टेशनवरील जुना पादचारी पूल काढण्याचे काम सुरू

कल्याण रेल्वे स्टेशनवरील जुना पादचारी पूल काढण्याचे काम सुरू

कल्याण दि.24 मार्च :
काही दिवसांपूर्वी मुंबईत पादचारी पूल पडून झालेल्या अपघातानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. जुन्या पुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या विविध स्टेशनवरील जुने पादचारी पूल काढून टाकण्यात येत आहेत. कल्याण रेल्वे स्थानकातील असाच एक जुना पादचारी पूल रेल्वे प्रशासनाने काढून टाकण्याचे काम सुरू केले आहे.

कल्याण स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर 1, वन ए आणि 2 नंबरला जोडणारा हा पादचारी पूल होता. तो जुना झाल्याने रेल्वेने तो काढण्यासाठी आज कल्याणमध्ये 8 तासांचा विशेष मेगाब्लॉक घेतला आहे.
हा जुना पूल काढण्यासाठी खास मुंबईहून एक भलीमोठी क्रेन मागवण्यात आली असून रेल्वेचे अनेक कर्मचारीही आज सकाळपासून त्यासाठी काम करत आहेत. हा पूल काढण्याच्या कामामुळे कल्याण स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1, वन1 आणि 2 नंबर वरील रेल्वे वाहतुक बंद ठेवण्यात आली आहे. तर स्लो ट्रेन सर्व जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*