Home ठळक बातम्या कचऱ्याच्या प्रश्नावर बालाजी गार्डनच्या रहिवाशांनी घेतली आमदार राजू पाटील यांची भेट

कचऱ्याच्या प्रश्नावर बालाजी गार्डनच्या रहिवाशांनी घेतली आमदार राजू पाटील यांची भेट

डोंबिवली दि.25 फेब्रुवारी :
कचरा उचलला जात नसल्याच्या प्रश्नावर डोंबिवली पूर्वेच्या बालाजी गार्डन सोसायटीतील रहिवाशांनी आमदार राजू पाटील यांची भेट घेतली.
डोंबिवली पूर्वेतील आयरे रोडवरील बालाजी गार्डन गृहप्रकल्पात 9 सोसायट्या आणि 522 सदनिका असून 2 हजाराच्या आसपास नागरिकांचे वास्तव्य आहे. या सोसायटीकडून केडीएमसीला दरवर्षी 55 लाख रुपये कर भरला जातो. मात्र त्यानंतरही महापालिका प्रशासन रहिवाशांना सहकार्य करीत नसल्याचे सांगत इथल्या नागरिकांनी आमदार राजू पाटील यांची भेट घेतली. सोसायटी आवारात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा नाही, तसेच गेल्या 4-5 दिवसांपासून कचरा उचलला न गेल्याने आवारात दुर्गंधी पसरल्याचे स्थानिकांनी सांगितले. तर पालिकेच्या सूचनांनुसार आम्ही ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करुन देऊनही पालिकेला सहकार्य करत असूनही आम्हाला पालिकेकडून सहकार्य मिळत नसल्याची खंत नागरिकांनी आमदार राजू पाटील यांच्याकडे व्यक्त केली.
दरम्यान याप्रश्नी आमदार राजू पाटील यांनी रहिवाशांसह पालिकेचे घनकचरा उपायुक्त रामदास कोकरे यांची भेट घेत हा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. त्यावर कोकरे यांनी लवकरच हा कचरा उचलला जाईल असे आश्वासन दिल्याचे यावेळी संगण्यात आले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा