Home कोरोना केडीएमसी क्षेत्रातील निर्बंध 20 जूनपर्यंत कायम; केडीएमसी अद्यापही लेव्हल 3 मध्येच

केडीएमसी क्षेत्रातील निर्बंध 20 जूनपर्यंत कायम; केडीएमसी अद्यापही लेव्हल 3 मध्येच

 

कल्याण -डोंबिवली दि.12 जून :
ब्रेक द चेनअंर्तगत नव्याने लागू करण्यात आलेले निर्बंध केडीएमसी क्षेत्रात पुढील आठवडाभर कायम राहणार आहेत. केडीएमसी अद्यापही निर्बंधांच्या लेव्हल 3 मध्येच असल्याने पूर्वीचेच निर्बंध कायम ठेवण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला.(Restrictions in the KDMC sector remain until June 20; KDMC is still in Level 3)

राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार दर आठवड्याला कोवीड परिस्थितीचे अवलोकन करून ब्रेक द चेनच्या निर्बंधांमध्ये बदल करण्याचे अधिकार केडीएमसी प्रशासनाला प्राप्त आहेत. 10 जूनचा आठवडा संपल्यानंतरही केडीएमसी क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि ऑक्सिजनचा वापर होणारी बेडसंख्या अद्यापही कमी झालेली नसल्याचे आढळून आले आहे. त्यामूळे केडीएमसी क्षेत्राचा अद्यापही लेव्हल 3 मध्येच समावेश असून त्यानूसार 20 जूनच्या रात्री 12 वाजेपर्यंत सर्व निर्बंध कायम ठेवण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शुक्रवारी रात्री दिले आहेत.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा