Home ठळक बातम्या लोकसभा निरीक्षकांनी घेतला ठाणे जिल्ह्यातील निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

लोकसभा निरीक्षकांनी घेतला ठाणे जिल्ह्यातील निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

ठाणे दि.11 एप्रिल: 
लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर ठाणे जिल्ह्यातील तिन्ही लोकसभा मतदारसंघात दाखल झालेल्या सर्वसाधारण निरीक्षकांनी जिल्ह्यातील निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेतला.

यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर, 23- भिवंडी या मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक रमेश चंदर बिधान (भा.प्र.से) 24-कल्याण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक मोहम्मद तय्यब (भा.प्र.से),25-ठाणे लोकसभा मतदारसंघाचे निरीक्षक  शेली क्र्रीशनानी (भा.प्र.से), पोलीस निरीक्षक किमे आया, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, 23- भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी किसन जावळे, 24- कल्याण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी शिवाजी काबदने, 25- ठाणे लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनिल पवार, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, डॉ शिवाजी राठोड, शालीमठ, उप जिल्हा निवडणूक अधिकारी अपर्णा सोमाणी तसेच सर्व नोडल अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यावेळी जिल्ह्यात निवडणूक घेण्यासाठी प्रशासनातर्फे होत असलेल्या तयारीची माहिती देण्यात आली. त्यानंतर सर्व नोडल अधिकाऱ्यांनी कामकाजाची माहिती दिली. पोलीस दल, होमगार्ड, सुरक्षा बल आदींबाबत माहिती देण्यात आली. निरीक्षकांनी निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार, विविध बाबींसंदर्भात करावयाच्या उपाययोजनांची माहिती दिली. त्याप्रमाणे आवश्यक उपाययोजना सुचविल्या. त्यात प्रामुख्याने मतदार जनजागृती, दिव्यांग मतदारांना पुरवावयाच्या सुविधा, ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रांची वाहतुक व सुरक्षा व्यवस्था, प्रतिबंधात्मक कारवाई, मद्य विक्री, विविध नोडल अधिकाऱ्यांकडून प्राप्त करावयाचे अहवाल आदींबाबत सुचना करण्यात आल्या. या सुचनांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*