Site icon LNN

नांदिवली गावामध्ये रस्ते काँक्रिटीकरण आणि बूस्टर पंप प्रकल्पाला सुरुवात ; आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते झाले भूमीपूजन

डोंबिवली दि.20 नोव्हेंबर :
कल्याण ग्रामीण विभागातील प्रभाग क्र. ३० नांदिवली गाव परिसरात मूलभूत गरजांची पूर्तता करण्यासाठी महत्त्वपूर्ण विकासकामांना सुरूवात करण्यात आली आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने तसेच आमदार राजेश मोरे यांच्या विशेष प्रयत्नांमुळे आणि अनिल म्हात्रे, संगीता म्हात्रे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामांचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला. (Road concretization and booster pump project begin in Nandivali village; Bhoomipoojan performed at the hands of MLA Rajesh More)

येथील नांदिवली बामन देव मंदिर परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण आणि बूस्टर पंप बसवण्यासाठी एकूण २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या महत्त्वाकांक्षी विकासकामाचे भूमीपूजन आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.

या विकास कामांमुळे नांदिवली परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून दर्जेदार पायाभूत सुविधा प्राप्त होणार आहेत. तर बुस्टर पंपामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून भेडसावणारा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे.

यावेळी शिवसेना कल्याण तालुका संघटक अर्जुन भाई पाटील, विभाग प्रमुख आकाश देसले, उपविभाग प्रमूख नितीन माळी, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश म्हात्रे, विधानसभा समन्वयक ओम लोके यांच्यासह अनेक शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या महत्त्वाच्या विकासकामांच्या शुभारंभामुळे नांदिवली परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Exit mobile version