Site icon LNN

डोंबिवलीतील राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय कुलकर्णी यांना साऊथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटीकडून डॉक्टरेट प्रदान

डोंबिवली दि.30 सप्टेंबर :
डोंबिवलीतील नामांकित राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच ज्येष्ठ मार्गदर्शक, शिक्षणतज्ञ संजय कुलकर्णी यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन साउथ वेस्टर्न अमेरिकन युनिव्हर्सिटी यांच्यावतीने डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. (Sanjay Kulkarni, President of the National Institute of Education in Dombivli, was awarded a doctorate from the South Western American University)

डोंबिवलीसारख्या शहरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान फार मोठे आहे. साहित्य क्षेत्रातही त्यांचे योगदान असून त्यांना वाचनाची आवड आहे. डॉक्टरेट पदवी मिळाल्याबद्दल संपूर्ण डोंबिवलीच्या शिक्षण क्षेत्रासह इतर सर्वच स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत आहे.

या सन्मानाबद्दल राष्ट्रीय शिक्षण संस्था आणि शारदा मंदिर संस्थेचे संचालक आर. डी. पाटील, विद्यासेवक पतपेढीचे अध्यक्ष सुधीर घागस आणि संचालक गजानन पाटील यांनी संजय कुलकर्णी यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Exit mobile version