Home Uncategorised कल्याणात संत निरंकारी मिशनची प्रभात फेरी संपन्न

कल्याणात संत निरंकारी मिशनची प्रभात फेरी संपन्न

कल्याण दि.20 जानेवारी : संत निरंकारी मिशनचा ५१ वा  महाराष्ट्र संत समागम नवी मुंबई खारघर येथे २७ ते ३० जानेवारी दरम्यान होणार असून याठिकाणी सद्गुरू माता सविंदर हरदेव सिंहजी महाराज या स्वतः उपस्थित राहणार आहेत.   हा संदेश जनमाणसांना देण्यासाठी संत निरंकारी मंडळ सेक्टर कल्याणच्या वतीने प्रभात फेरी काढण्यात आली. कल्याण सेक्टर संयोजक जगन्नाथ म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली  बेतूरकर पाडा येथून या प्रभात फेरीला सुरवात करण्यात आली. खडकपाडा – साईचौक – ब वार्ड – आयकॉन प्लाझा हॉल – R.T.O. – बिर्ला कॉलेज – मिलिंद नगर मार्गे गौरी पाडा तलाव येथे या प्रभात फेरीची सांगता करण्यात आली.

या प्रभात फेरीत कल्याण परिसरातील कोनगाव, सरवली, पिंपळास, पिंपळनेर, रांजनोली, नेतिवली, पिसवली, नेताजी नगर, मानेरा, द्वारली, बुर्दुल, नांदिवली, कल्याण पश्चिम, मिलिंद नगर आदी भागातील सुमारे पाचशे निरंकारी भाविकांनी आणि स्वयंसेवकांनी तसेच दुचाकी स्वारांनी सहभाग घेऊन कल्याणकरांना मानवता, एकत्व, सहनशीलता अशा मानवीमुल्यांचा संदेश दिला.तसेच खारघर येथे होणारया निरंकारी संत समागमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*