Site icon LNN

आत्मनिर्भर भारत उपक्रमाची सुरुवात डोंबिवलीतून; फक्त स्वदेशी वस्तूच वापरण्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचे आवाहन

डोंबिवली दि.24 सप्टेंबर :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आत्मनिर्भर भारताच्या दिशेने आपला देश निरंतर वाटचाल करत आहे. या वाटचालीला गती देण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाचे योगदान आवश्यक आहे. यासाठीच प्रत्येक भारतीयाने स्वदेशी वस्तू वापरण्याचे आवाहन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी केले आहे. (Self-reliant India initiative starts from Dombivli; BJP state president Ravindra Chavan appeals to use only indigenous products)

हे आवाहन प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘प्रत्येक घरी स्वदेशी, घरोघरी स्वदेशी’ या आवाहनानुसार आकाशात झेपावलेला भव्य फुगा डोंबिवलीतील घारडा सर्कल येथील ‘नमो रमो नवरात्री’च्या परिसरात लावण्यात आला आहे. यासोबतच याठिकाणी स्वदेशी वस्तू वापरण्याचा संदेश देणारे फलकही लावण्यात आले आहेत. भव्य फुगा आणि फलक बघून प्रत्येकाच्या मनातील फक्त स्वदेशी वस्तू वापरण्याचा संकल्प आणखी दृढ होईल असा विश्वासही प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केले.

भाजपाच्या वतीने देशभरात ‘आत्मनिर्भर भारत संकल्प अभियान’ राबवले जाणार आहे. आपणही या अभियानात सामील होऊन आत्मनिर्भर भारताचा संकल्प करूया, फक्त स्वदेशी वस्तूच वापरूया असे आवाहन चव्हाण यांनी यावेळी केले.

यावेळी कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, भाजपा महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती मोर्चा सरचिटणीस शशिकांत कांबळे, मंडल अध्यक्ष – मितेश पेणकर, कर्ण जाधव,धनाजी पाटील,प्रिया जोशी, शक्तिवान भोईर,रितेश फडके,पवन पाटील,लक्ष्मण पंत,परेश तेलंगे, विश्वजीत करंजुले,नितेश म्हात्रे,स्वप्निल काटे,समीर भंडारे,नवनाथ पाटील, माजी नगरसेवक मुकुंद (विशू) पेडणेकर, वाहतूक जिल्हाध्यक्षदत्ताजी माळेकर. मंडल सरचिटणीस संतोष शुक्ला, प्रकाश (बाळा) पवार, जयप्रकाश सावंत. युवा मोर्चा अध्यक्ष अथर्व कांबळे, सुजय विचारे, रवी सिंग ठाकूर, सुमित चौधरी. राजस्थान प्रकोष्ठ अध्यक्ष राजेंद्र जैन. आणि ज्योतीताई पाटील, श्रुतीताई उरणकर, साधनाताई गायकवाड, गायत्रीताई कांबळे, प्रियाताई मोमाया, ज्योतीताई अमृते उपस्थित होते.

Exit mobile version