Home ठळक बातम्या दिपावलीचे औचित्य साधत राजेश मोरे यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

दिपावलीचे औचित्य साधत राजेश मोरे यांच्यातर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

डोंबिवली दि.6 नोव्हेंबर :
सध्या सुरू असणाऱ्या दिपावलीच्या प्रकाशोत्सवानिमित्त शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख आणि नगरसेवक राजेश मोरे यांच्यातर्फे अनेक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. प्लास्टिकचा वापर टाळा, कचरा वर्गीकरण करा व स्वच्छ डोंबिवली सुंदर डोंबिवली असा संदेश देत मोरे यांनी प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांना गौरवले.प्रभाग क्रमांक 76 रघुवीर नगर व 77 दत्तनगर या दोन प्रभागातील सुमारे अडीचशे ज्येष्ठ नागरिकांचा दिवाळीच्या पूर्वसंध्येला स्वातंत्र्यवीर सावरकर उद्यान,दत्तनगर येथे घरगुती फराळ पुडा, शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाखाप्रमुख बबन जगताप व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. राजेश मोरे व त्यांच्या पत्नी भारती मोरे यांनी आपल्या या दोन प्रभागात प्रत्येक घरी तब्बल पंधरा हजार कुटुंबांना घरगुती फराळाचा बाॕक्स देऊन दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*