Home बातम्या कल्याणातील 1 हजार पूरग्रस्तांना शिवसेनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कल्याणातील 1 हजार पूरग्रस्तांना शिवसेनेतर्फे जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

 

ही मदत नव्हे तर आमचे कर्तव्यच-आमदार विश्वनाथ भोईर

कल्याण दि.2 ऑगस्ट :
जुलै महिन्यात कल्याण शहराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले. सतत कोसळणाऱ्या धुवांधार पावसाने कल्याण पश्चिम मतदारसंघातील मांडा-टिटवाळा, अटाळी, वडवली, घोलपनगर, भवानी चौक, गोविंदवाडी,रेतीबंदर येथील भागात मोठ्या प्रमाणात पूरुपरिस्थिती निर्माण झाली होती. घरात पाणी शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले असून गोरगरीब जनतेसमोर मोठी समस्या निर्माण झाली होती. अशा वेळी आपले कर्तव्य म्हणून कल्याण शहर शिवसेना शाखेतर्फे पूरग्रस्तांना अन्नधान्य तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

कल्याण पश्चिमचे आमदार आणि शहरप्रमुख विश्वनाथ भोईर यांच्यातर्फे टिटवाळा येथील सिद्धिविनायक मंदिर परिसरातून सुरुवात करण्यात आली. मांडा-टिटवाळा येथील सुमारे 250 जणांना, घोलपनगर, भवानी चौक येथील 450 जणांना तर अटाळी-वडवली येथील 450 पूरग्रस्तांना आमदार विश्वनाथ भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक दुर्योधन पाटील यांच्यातर्फे मदतीचे वाटप करण्यात आले.
मुसळधार पावसाने अनेकांचे खूप नुकसान झाले असून शासनाकडून त्याचे पंचनामे सुरू आहेत. शासनाची जी काही मदत असेल ती पूरग्रस्तांना मिळेलच परंतू शिवसेना हा समाजाभिमुख पक्ष असल्याने मदत नव्हे तर कर्तव्य करण्याच्या भावनेने हा उपक्रम राबवल्याचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी सांगितले.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा