Home बातम्या आदिवासी दिनानिमित्त शिवसेनेतर्फे आदिवासी पाड्यांवर अन्नधान्य वाटप

आदिवासी दिनानिमित्त शिवसेनेतर्फे आदिवासी पाड्यांवर अन्नधान्य वाटप

 

कल्याण दि.10 ऑगस्ट :
जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून शिवसेनेच्या वतीने मोहन उगले यांच्या पुढाकाराने आदिवासी पाड्यांवर अन्नधान्य वाटप करण्यात आले. कल्याण पश्चिमेतील शिवसेना ठाणकर पाडा विभागाच्या वतीने मोहीली गाव याठिकाणी जाऊन 35 आदिवासी कुटुंबांना अन्नधान्य स्वरूपात मदत करण्यात आली. शिवसेनेचे विभागप्रमुख मोहन उगले यांच्या पुढाकाराने ही मदत पोहोचविण्यात आली.

यावेळी उपशहर प्रमुख विजय काटकर, उपजिल्हाप्रमुख अरविंद बाळकृष्ण मोरे, महिला शहर संघटक सुजाता धारगळकर, संगीता राजगुरू, तेजश्री सपकाळ, शाखाप्रमुख स्वप्नील मोरे, अनंता पगार, महिला शाखा संघटक नेत्रा मोहन उगले, महिला शाखा संघटक कल्पना जमदाडे, महिला शाखा संघटक मीना सावंत, सुरेखा दिघे, सुरेखा शिंदे, सचिन भाटे, संदीप पगारे, उमेश भुजबळ, संतोष झोडगे, निलेश चोणकर, दीपक भालेराव, प्रदीप मोरे, आशिष झाडे, प्रदीप हुले, युवा सेना संघटक रोहन कोट, सुनिता मोरे आदींनी परिश्रम घेतले.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आतापर्यंत सव्वाचार लाख लोकांनी घेतलाय 1ला डोस; तर दिड लाख जणांचे झालेत दोन्ही डोस
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 31 रुग्ण तर 82 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा