कल्याण दि.2 जानेवारी :
कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीत शिवसेनेच्या नगरसेवक पदाच्या उमेदवारांची विजयी घोडदौड सुरूच असून डोंबिवली येथील प्रभाग क्रमांक २८ मधून ज्योती मराठे आणि कल्याण पूर्वेतून प्रभाग क्रमांक ११ मधून रेश्मा निचळ या दोन ही शिवसेनेच्या नगरसेवक पदाच्या उमेदवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून याबाबत फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत शुक्रवारी प्रभाग क्रमांक २४ मधून रमेश म्हात्रे, विश्वनाथ राणे, वृषाली जोशी, प्रभाग क्रमांक २८ येथील शिवसेनेचे नगरसेवक पदाचे उमेदवार हर्षल राजेश मोरे हे देखील बिनविरोध विजयी झाले. तर यामुळे शिवसेनेच्या बिनविरोध विजयी झालेल्या नगरसेवकांची संख्या सहा इतकी झाली आहे.
शिवसेनेच्या या विजयामुळे इतर नगरसेवक पदाच्या उमेदवारांमध्ये देखील जल्लोषाचे वातावरण आहे. तर शहरातील सर्व शिवसैनिकांकडून विजय साजरा करण्यात येत आहे.

