Home ठळक बातम्या पर्यावरण रक्षणाचा संदेश देत श्रीकांत शिंदे यांनी दाखल केला अर्ज ; समर्थनार्थ...

पर्यावरण रक्षणाचा संदेश देत श्रीकांत शिंदे यांनी दाखल केला अर्ज ; समर्थनार्थ लोटला अलोट जनसमुदाय

डोंबिवली दि.9 एप्रिल :
शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीचे कल्याण लोकसभेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पर्यावरण रक्षणाचा संदेश देत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. विशेष म्हणजे यावेळी डॉ. शिंदे यांच्या समर्थनार्थ जमलेल्या अलोट गर्दीने सर्व रस्ते फुलून गेल्याने श्रीकांत शिंदे यांना चक्क बाईकवर निवडणूक कार्यालय गाठावे लागले. हजारो शिवसैनिक, भाजप कार्यकर्ते आणि भीमसैनिकांच्या उपस्थितीत डॉ. शिंदे यांनी आपला दाखल केला.

 

डोंबिवलीचा मानबिंदू असलेल्या फडके रोड येथील श्री गणेश मंदिरात गणरायाचे दर्शन घेऊन श्रीकांत शिंदे यांनी तेथील उद्यानात वृक्षारोपण केल्यानंतर या मिरवणुकीला प्रारंभ झाला. मिरवणुकीतही पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा रथ लोकांचे लक्ष वेधून घेत होता. गेली दोन वर्षे डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेऊन अंबरनाथ तालुक्यात लोकसहभागातून दीड लाखांहून अधिक वृक्षांची लागवड केली आहे. पर्यावरण हा आपल्यासाठी केवळ बोलण्याचा विषय नसून प्रत्यक्ष कृतीचा आणि जबाबदारीचा विषय आहे, असे त्यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी सांगितले.

 

 

दरम्यान डॉ. शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने संपूर्ण डोंबिवली शहर भगवेमय झाले होते. शहरातील प्रमुख रस्त्यांवरून मिरवणूक निघून शिवघोषाच्या गजरात सावळाराम क्रीडा संकुलात दाखल झाली. मिरवणुकीतील महिलांचे लेझिम पथक, ढोलताशांचे पथक, आदिवासी बांधवांचे तारपा नृत्य विशेष आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.

 

 

याप्रसंगी शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजप नेते रवींद्र चव्हाण, माजी खासदार जगन्नाथ पाटील, श्रमजीवी संघटनेचे विवेक पंडित, आमदार रवींद्र फाटक, सुभाष भोईर, किसन कथोरे, डॉ. बालाजी किणिकर, गणपत गायकवाड, शांताराम मोरे, रुपेश म्हात्रे, नरेंद्र पवार, निरंजन डावखरे, भिवंडी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार कपिल पाटील, रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे, जिल्हाप्रमुख प्रल्हाद जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, उपजिल्हाप्रमुख पुंडलिक म्हात्रे, सदानंद थरवळ, भाजपचे कल्याण लोकसभा विस्तारक शशिकांत कांबळे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*