Home बातम्या एसएस क्लिनिक’ आणि स्वामी समर्थ मठ ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय शिबिराचे आयोजन

एसएस क्लिनिक’ आणि स्वामी समर्थ मठ ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने वैद्यकीय शिबिराचे आयोजन

 

कल्याण दि.13 ऑक्टोबर :
‘एसएस क्लिनिक’ आणि स्वामी समर्थ मठ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कल्याणमधील नीरज सिटी येथील गोदरेज पार्क येथे मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ‘एसएस क्लिनिक’चे संचालक डॉ.राहुल दुबे,’ ड्रीम 32 डेंटल क्लिनिक’चे डॉ.विशाल उबाळे यांच्यासह डॉ.भूषण भट्ट आणि डॉ.पंकज शर्मा, स्वराज्य ऑप्टिकल्सच्या डिंपल सेठ, ब्लडचेकअप हेल्थ केअर सेंटरचे संचालक डॉ. पंकज शुक्ला आणि मोहम्मद तनवीर, विजय कनोजिया, स्वामी समर्थ मठ ट्रस्टचे पदाधिकारी आणि त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते. शिबिरात मोफत – नेत्र तपासणी, रक्त शर्करा, रक्तदाब, दंत तपासणी, ऑक्सिजन, पल्सरेट याशिवाय मोफत सुविधा शहर प्रसिद्ध डॉक्टरांनी दिल्या होत्या, ज्याचा शेकडो लोकांनी लाभ घेतला.

‘एसएस क्लिनिक’चे संचालक डॉ.राहुल दुबे म्हणाले की, कोरोना कालावधी पाहता जनतेसाठी एक छोटासा प्रयत्न करण्यात आला आहे. ते म्हणाले की, राज्यात रक्ताचा तुटवडा आहे, त्यामुळे रक्तदान करण्यासाठी पुढील शिबीर आयोजित केले जाईल. कार्यक्रमाचे आयोजक डॉ.राहुल दुबे आणि ट्रस्टचे अधिकारी विजय कनोजिया यांनी शिबिरात आलेल्या विशेष पाहुण्यांचे स्वागत केले आणि लोकांना त्याच प्रकारे सहकार्य राखण्याचे आवाहन केले.

मागील लेखअखेर प्रतिक्षा संपली; डोंबिवलीतील पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राचे उद्घाटन
पुढील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 61 रुग्ण तर 75 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा