Site icon LNN

पुण्यातील राज्यस्तरीय शिक्षण परिषद; महापालिका शाळांतील पटसंख्या वाढवण्याच्या केडीएमसी प्रयत्नांचे झाले कौतुक


कल्याण डोंबिवली दि.23 सप्टेंबर :

महापालिका शाळांमधील विद्यार्थीसंख्या वाढवण्यासाठी सुरू असलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रयत्नांचे पुण्यात झालेल्या राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत कौतुक करण्यात आले. पुण्यातील या शिक्षण परिषदेत राज्यातील जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकाऱ्यांसह कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाकडूनही शैक्षणिक प्रगतीचे सादरीकरण करण्यात आले. (State Level Education Council in Pune; KDMC’s efforts to increase the number of students in municipal schools were appreciated)

यावेळी कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या संकल्पनेतून आणि सर्व शाळांचे पालक अधिकारी यांच्या सहकार्याने महापालिकेच्या शिक्षण क्षेत्रात सुरू असलेल्या उपक्रमांचे शिक्षण विभागाचे उपायुक्त संजय जाधव यांनी सादरीकरण केले. ज्याचे या शिक्षण परिषदेतील उपस्थितांनी विशेष कौतुक केले.

महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा कार्यभार हाती घेताच प्रथमतः आरोग्य आणि शिक्षण या दोन महत्त्वाच्या बाबींवर आपले लक्ष केंद्रित केले. आणि त्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टिकोनातून अंमलबजावणीस प्रारंभ केला. महापालिका शाळांमधील घसरती पटसंख्या लक्षात घेऊन आयुक्तांनी शाळेचे इन्फ्रास्ट्रक्चर सुधारणे, शालेय साहित्य वेळेमध्ये उपलब्ध करून देणे(उदा. वह्या, पुस्तके, गणवेश इ.) आणि इतर सुविधा (विद्यार्थ्यांसाठी सहली, क्रीडा स्पर्धा इ.चे आयोजन ,चांगल्या मिड डे meal चा पुरवठा) या त्रिसूत्री कार्यक्रमांवर भर दिला. तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यासाठी दर महिन्याला त्यांच्या पायाभूत चाचणीला प्रारंभ करत त्यापाठोपाठ शिक्षण परिषद परिषदेचेही आयोजन करण्यात आले.

परिणामी पहिल्या शिक्षण परिषदेनंतर असलेली निपुण विद्यार्थ्यांची टक्केवारी 18 टक्क्याहून 44 टक्क्यांपर्यंत वाढण्यास मदत झाली आहे. शाळांमध्ये गुणवत्ता वाढीस चालना दिल्यामुळे 400 पेक्षा जास्त नविन विद्यार्थ्यांनी महापालिका शाळांमध्ये यावर्षी प्रवेश घेतला, यंदापासून महापालिका आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या सात सेमी इंग्लिश शाळांनाही चांगला प्रतिसाद मिळाला. इतकेच नाही तर महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे आणि शिक्षकांच्या प्रयत्नांचे वेळोवेळी अवलोकन करण्यासाठी महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे सखोल सादरीकरण शिक्षण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव यांनी या शिक्षण परिषदेत सादर केले.

या परिषदेस शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे, प्रधान सचिव शिक्षण, संचालक SCERT, राज्यातील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version