Home ठळक बातम्या डोंबिवलीच्या घरडा सर्कल परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी

डोंबिवलीच्या घरडा सर्कल परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी

पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना देण्यात आले निवेदन

डोंबिवली दि.21 एप्रिल :
डोंबिवली पूर्वेच्या घरडा सर्कल परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची मागणी डोंबिवली शिवसेना शहर प्रमूख राजेश मोरे यांनी केली आहे. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवेदन देत त्यांनी ही मागणी केली आहे.

मुंबई आणि कल्याण येथून डोंबिवलीत प्रवेश करताना के व्ही पेंढारकर कॉलेजच्या पुढे घरडा सर्कल असून याठिकाणी वीरमरण आलेल्या विनय कुमार सच्चान यांचे स्मारक आहे. त्यासमोर असणाऱ्या घरडा सर्कलमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारावा आणि त्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी राजेश मोरे यांनी आपल्या पत्रात केली आहे.

दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे सुसज्ज स्मारक उभारण्यासाठी कोणत्याही प्रकारे निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचा शब्द नगरविकास,पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिल्याचे राजेश मोरे यांनी सांगितले. तसेच डोंबिवली शहराची ओळख ठरेल असा आराखडा तयार करण्याच्या सूचनाही पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे हे स्मारक डोंबिवलीची एक आगळी वेगळी ओळख ठरेल. तसेच डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक शहराला प्रेरणादायी ठरेल असा विश्वासही शहरप्रमुख राजेश मोरे यांनी व्यक्त केला आहे. यावेळी आमदार बालाजी किणीकर, उपशहर प्रमूख संतोष चव्हाण हेदेखील उपस्थित होते.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा