Home क्राइम वॉच कल्याणचे तहसीलदार आणि शिपायाला 1 लाख 20 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

कल्याणचे तहसीलदार आणि शिपायाला 1 लाख 20 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले

 

कल्याण दि.30 ऑगस्ट :
कल्याणचे तहसिलदार आणि त्यांच्या शिपायाला 1 लाख 20 हजारांची लाच घेताना आज अँटी करप्शन विभागाने रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली आहे. जमिनीच्या हरकतीच्या सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी ही लाच स्विकारताना ठाणे अँटी करप्शनने ही कारवाई केली.

तक्रारदार यांची कल्याण – मुरबाड मार्गावर असणाऱ्या वरप परिसरात जमीन आहे. या जमिनीच्या हरकतीवरील सुनावणीचे निकालपत्र देण्यासाठी तहसिलदार दिपक आकडे यांनी स्वतःसाठी 1 लाख रुपयांची मागणी करून ती कार्यालयातील शिपाई बाबू उर्फ मनोहर हरड यांच्याकडे देण्यास सांगितले. त्यानंतर बाबू हरड याने स्वतःसाठी आणि स्टाफसाठी त्यात अधिकच्या 20 हजार रुपयांची मागणी केल्याचे अँटी करप्शनने केलेल्या पडताळणीत निष्पन्न झाले. त्यानूसार आज ठाणे अँटी करप्शनने सापळा लावत बाबू हरडला तहसिलदार आकडे यांच्यासाठी 1 लाख आणि स्वतःसाठी 20 हजार असे एकूण 1 लाख 20 हजारांची लाच घेताना रंगेहात पकडल्याची माहिती ठाणे अँटी करप्शनने दिली आहे.

या घटनेने कल्याणच्या शासकीय कार्यालयात खळबळ उडाली आहे. यापूर्वीही कल्याण तहसिलदार कार्यालयात नायब तहसिलदाराना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले होते. यानंतर ठाणे अँटी करप्शनची ही तहसिलदार कार्यालयातील सर्वात मोठी कारवाई म्हणावी लागेल.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा