Home Uncategorised ठाकुर्ली पुलाचे अर्धवट काम उद्यापासून सुरू करण्याचे पालिकेचे मनसेला आश्वासन

ठाकुर्ली पुलाचे अर्धवट काम उद्यापासून सुरू करण्याचे पालिकेचे मनसेला आश्वासन

ठाकुर्ली दि.17 जानेवारी :
ठाकुर्ली पुलाचे काम अर्धवट असल्यामुळे पुलासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यामुळे प्रचंड प्रमाणात धूळ उडते. यामुळे आजूबाजूचे नागरिक प्रचंड हैराण झाले असून उडणाऱ्या धुळीमुळे घरांचे दारे-खिडक्याही उघडता येत नाही. या पुलाचे रखडलेले काम लवकरात लवकर करण्यासाठी स्थानिकांनी मनसे माजी नगरसेवक हर्षद हरिश्चंद्र पाटील यांना निवेदन दिले होते. या अनुषंगाने आज या परिसराचा शासकीय अधिकाऱ्यांसोबत संयुक्तिक पाहणी दौरा ठेवला होता.

याप्रसंगी महानगरपालिका अधिकारी आणि वाहतूक शाखेचे पोलीस अधिकारी तसेच त्रस्त नागरिक व मनसेचे विरोधी पक्ष नेते प्रकाश भोईर,प्रदेश उपाध्यक्ष तथा डोंबिवली शहर अध्यक्ष राजेश कदम, प्रकाश माने,निलेश भोसले,चंद्रकांत जोशी व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते, यावेळेला संबधीत ठेकेदारांनी अर्धवट असलेल्या रस्त्याचे काम उद्यापासून सुरू करण्याचे तसेच सदर काम येत्या दोन अडीच महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*