Home ठळक बातम्या ठाकुर्लीतील जुन्या पादचारी पुलाकडेही रेल्वेने तातडीने लक्ष देण्याची मागणी

ठाकुर्लीतील जुन्या पादचारी पुलाकडेही रेल्वेने तातडीने लक्ष देण्याची मागणी

डोंबिवली दि.15 मार्च :
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या पादचारी पुलाच्या दुर्घटनेनंतर इतर स्थानकातील पादचारी पुलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. ठाकुर्ली रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या (मुंबई दिशेकडील) जुन्या पादचारी पुलाबाबतही प्रवाशांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या जुन्या पुलावरून चालताना हादरे जाणवत असल्याची माहिती प्रवाशांनी दिली असून मुंबईसारखी दुर्घटना घडण्याच्या आणि नाहक बळी जाण्याच्या आधी रेल्वे प्रशासनाने त्याकडे लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान या पुलाच्या पर्यायी नविन पुलाचे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याचे प्रवाशांचे म्हणणे असून ते कामही युद्धपातळीवर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*