Home क्राइम वॉच लाच म्हणून केली चक्क शरीरसुखाची मागणी; केडीएमसीच्या लिपिकाला अँटी करप्शनने पकडले

लाच म्हणून केली चक्क शरीरसुखाची मागणी; केडीएमसीच्या लिपिकाला अँटी करप्शनने पकडले

कल्याण दि.28 फेब्रुवारी :
पैशाचा भ्रष्टाचार आणि लाचखोरांबाबत कुप्रसिद्ध असणारी कल्याण डोंबिवली महापालिका आज लाचेच्या एका वेगळ्याच प्रकारामुळे प्रकाशझोतात आली आहे. थकीत मालमत्ता कराला मुदतवाढ देण्यासाठी लाच म्हणून चक्क शरिरसुखाची मागणी करणाऱ्या कल्याण डोंबिवली महापालिकेच्या लिपिकाला ठाणे अँटी करप्शनने पकडले आहे. आतापर्यंत लाच म्हणून पैसे घेताना अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अँटी करप्शनने पकडले असताना लिपिकाच्या या घृणास्पद प्रकारामुळे महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे.
रमेशचंद्र राजपूत असे या लिपिकाचे नाव असून तो महापालिकेच्या ‘क’ प्रभागात कार्यरत आहे. घराचा थकित मालमत्ता करापोटी राजपूतने जप्ती वॉरंटची अंतिम सूचना संबंधित तक्रारदाराला बजावली होती. तर मालमत्ता कराची रक्कम कमी करण्यासह तो भरण्यास मुदतवाढ देण्यासाठी राजपुतने संबंधित महिलेकडे चक्क शरिरसुखाची मागणी केली. याबाबत तिने ठाणे अँटी करप्शनकडे तक्रार दाखल केली असता आज दुपारी महापालिकेजवळील मैदानात राजपूतला अँटी करप्शनने ताब्यात घेतले.

दरम्यान आतापर्यंत महापालिकेचे अनेक अधिकारी- कर्मचारी लाच म्हणून पैसे घेताना रंगेहात सापडले आहेत. मात्र लाच म्हणून थेट शरिरसुखाची मागणी करणाऱ्या या लिपिकाच्या प्रकाराने संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*