Home ठळक बातम्या नगरसेवकाकडून खासदारांना अनोख्या शुभेच्छा; कल्याण पूर्वेतील बॅनर ठरतोय चर्चेचा विषय

नगरसेवकाकडून खासदारांना अनोख्या शुभेच्छा; कल्याण पूर्वेतील बॅनर ठरतोय चर्चेचा विषय

कल्याण दि.4 फेब्रुवारी :
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी कल्याण पूर्वेत ज्येष्ठ नगरसेवकाने लावलेला बॅनर सध्या सोशल मिडियासह कल्याणात चर्चेचा विषय ठरत आहे. शिवसेनेचे नगरसेवक मल्लेश शेट्टी यांनी हा बॅनर लावला आहे.
कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा आज वाढदिवस असून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नेतीवली येथील चौकात हा बॅनर लावण्यात आला आहे. ‘खासदार दिलदार है, लेकीन कुछ चमचोसे लोग परेशान है’ अशा शब्दांत शेट्टी यांनी खासदार डॉ. शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामुळे कल्याणमध्ये हा बॅनर चर्चेचा विषय बनला असून आता सोशल मीडियावरही व्हायरल होऊ लागला आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा