कल्याण डोंबिवलीत कोरोनाचा आलेख चढताच; चार दिवसांत 552 रुग्ण आणि 7 जणांचा मृत्यू

  कल्याण/ डोंबिवली दि.20 फेब्रुवारी : 
  कधी काळी कोरोनाचा हॉटस्पॉट बनलेल्या कल्याण डोंबिवलीमध्ये कोरोना रुग्णांचा आलेख पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गेल्या 4 दिवसांत कल्याण डोंबिवलीमध्ये तब्बल 552 रुग्ण आढळले असून 7 जणांचा मृत्यू झाल्याचे केडीएमसीकडून देण्यात आलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे. तर अनेक दिवसांनंतर ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांच्या संख्येनेही 1 हजाराचा टप्पा ओलांडल्याचे केडीएमसीकडून दररोज दिल्या जाणाऱ्या आकडेवारीवरून दिसत आहे. मात्र ही एकत्रित आकडेवारी देऊन घबराट परवण्याचा कोणताही हेतू नसून नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी हाच एकमेव उद्देश आहे.

  गेल्या आठवड्यापर्यंत कल्याण डोंबिवलीमध्ये दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या 70 – 80 च्या घरात मर्यादित होती. तर ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांचा आकडाही लक्षणीयरीत्या कमी झाला होता. मात्र गेल्या 4 दिवसांत यामध्ये हळूहळू का होईना पण वाढ होताना दिसत आहे. विशेष म्हणजे गेल्या 4 दिवसांत प्रत्येक दिवशी 100 हून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तेदेखील वाढत्या रुग्णसंख्येने. तर त्यातही डोंबिवली पूर्व – 207 रुग्ण, डोंबिवली पश्चिम – 80, कल्याण पश्चिम-171 रुग्ण, कल्याण पूर्व – 75, मांडा – टिटवाळा – 13 आणि मोहना परिसरात 6 रुग्ण आढळले आहेत.

  या सर्व आकडेवारीचा विचार करता कल्याण डोंबिवलीतील नागरिकांनी कोरोनाचे सर्व नियम काटेकोरपणे पाळण्याची गरज अधिरेखीत होत आहे. केवळ सामान्य नागरिकांनीच नव्हे तर इथल्या राजकीय पदाधिकाऱ्यांनीही या परिस्थितीचे गांभिर्य ओळखून सार्वजनिक समारंभ, सोहळयांबाबत निर्णय घेण्याची गरज आहे. अन्यथा अनेकांचे बलिदान आणि डोंगराएवढी मेहनत घेऊन नियंत्रणात आलेली ही परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही.

  गेल्या 4 दिवसांतील कोरोना रुग्ण…

  • 20 फेब्रुवारी – 147 पेशंट.. 2 मृत्यू
  • 19 फेब्रुवारी – 145 पेशंट ..3 मृत्यू
  • 18 फेब्रुवारी – 132 पेशंट ..1 मृत्यू
  • 17 फेब्रुवारी – 128 पेशंट ..1 मृत्यू

  Leave a Reply Cancel reply Your email address will not be published. where to buy viagra in malaysia Red tape — the software rules — is terrifying industry aggregation and make, Grattan says.

  मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 147 रुग्ण तर 112 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
  पुढील लेखकल्याण-शिळ रोडवरील नामांकित गृहप्रकल्पाच्या कामगार वसाहतीमध्ये भीषण आग; एकाचा मृत्यू

  तुमची प्रतिक्रिया लिहा

  तुमची कंमेंट लिहा
  तुमचे नाव लिहा