Home ठळक बातम्या डोंबिवलीपूर्वेतील गावदेवी मंदिर ते आयकॉन हॉस्पिटलचा रस्ता उद्या वाहतूकीसाठी राहणार बंद

डोंबिवलीपूर्वेतील गावदेवी मंदिर ते आयकॉन हॉस्पिटलचा रस्ता उद्या वाहतूकीसाठी राहणार बंद

डोंबिवलीपूर्वेतील गावदेवी मंदिर ते आयकॉन हॉस्पिटलचा रस्ता उद्या वाहतूकीसाठी राहणार बंद

डोंबिवली दि.4 ऑगस्ट :
डोंबिवली मानपाडा रोडवरील गावदेवी मंदिर ते आयकॉन हॉस्पिटलच्या दिशेने जाणार रस्ता उद्या वाहतूकीसाठी बंद राहणार आहे. या मार्गावर असणारी अतिधोकादायक इमारत पाडण्याच्या कामामूळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून हा रस्ता बंद राहणार आहे. डोंबिवली वाहतूक पोलिसांच्या उपविभागातर्फे याबाबत माहिती देण्यात आली आहे. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी बंद राहणार असून इथली वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे.

हा मार्ग असणार बंद…
चार रस्ता- मानपाडा रोड- डोंबिवली पूर्ववरून गावदेवी मंदिराच्या दिशेने जाणाऱ्या सर्व वाहनांना प्रवेश बंदी असणार आहे.

असा आहे पर्यायी मार्ग…
संत नामदेव पथ- डाव्या बाजूला वळण घेऊन गोग्रासवाडी – आइस फॅक्टरी – शिव उद्योग नगर मार्गे इच्छितस्थळी जाऊ शकतील. तर गावदेवी मंदिराच्या दिशेने जाणारी सर्व हलकी वाहने (दुचाकी – चारचाकी) गावदेवी मंदिर येथून वळण घेऊन आयकॉन हॉस्पिटल ते चार रस्ताकडे येणाऱ्या मार्गावर एका लेनद्वारे वळवून पुढे आयकॉन हॉस्पिटलसमोरून पुढे जातील अशी माहिती डोंबिवली वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

मागील लेखकल्याण डोंबिवलीत आज आढळले कोरोनाचे 61 रुग्ण तर 82 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज
पुढील लेखकेडीएमसी क्षेत्रात उद्या (5 ऑगस्ट) 2 ठिकाणी लसीकरण ; कोवीशिल्डचे डोस मिळणार

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा