Home क्राइम वॉच शक्ती कायदा मंजूर होणे हा राज्यातील सर्व महिलांचा विजय – आमदार राजू...

शक्ती कायदा मंजूर होणे हा राज्यातील सर्व महिलांचा विजय – आमदार राजू पाटील

राज्य सरकारतर्फे शक्ती कायदा एकमताने मंजूर ; मनसे आमदार राजू पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

डोंबिवली दि.24 डिसेंबर :
मनसे आमदार राजू पाटील यांनी 2019 साली दिशा कायद्याच्या धर्तीवर राज्यामध्ये शक्ती कायदा राज्यात लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. अखेर या मागणीला यश आले असून राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शक्ती कायदा एकमताने मंजूर करण्यात आला. विरोधकांनीही या कायद्याचं स्वागत केलं आहे. बलात्कार, सामूहिक बलात्कार, ॲसिड हल्ला, सोशल मीडियावर महिला आणि लहान मुलांबाबत वादग्रस्त किंवा आक्षेपार्ह मजकूर, छायाचित्र प्रसारित करून बदनामी अशा सगळ्या प्रकरणांमध्ये कठोर शिक्षेची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. दरम्यान मनसे आमदार राजू पाटील यांनी सरकारचे आभार मानत हा महाराष्ट्रातील सर्व महिलांचा विजय असल्याची प्रतिक्रिया आमदार राजू पाटील यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातील वाढते बलात्कार व महिला अत्याचाराविरोधात ‛दिशा’ कायद्याच्या धर्तीवर कठोर कायदा होण्यासाठी मी नेहमीच आग्रही होतो, पाठपुरावा करत होतो. अखेर शक्ती कायदा विधानसभेत एकमताने मंजूर होणे हा महाराष्ट्रातील सर्व महिलांचा विजय असल्याचे आमदार पाटील म्हणाले.

महाराष्ट्रात घडणाऱ्या बलात्काराच्या वारंवार घटनांच्या पार्श्वभूमीवर बलात्कार पिडीतेला न्याय मिळवून देण्यासाठी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर कठोर कारवाई करणारा कायदा असावा अशी मागणी आमदार राजू पाटील यांनी वारंवार केली होती. अशा प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर न्यायालयात वर्षानुवर्षे तपास आणि सुनावणी सुरु राहते. त्यामुळे गुन्हेगारांवर कायद्याचा धाक, वचक राहिला नाही आणि बलात्कार पिडितेला योग्य न्याय मिळण्यासही मोठा कालावधी लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही आंध्रप्रदेशप्रमाणे कठोर कायदा करण्याची वेळ आल्याची गरज आमदार पाटील यांनी अधोरेखित केली होती.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा