Home ठळक बातम्या कल्याण डोंबिवलीतील तापमानाचा पारा आला १४ अशांवर

कल्याण डोंबिवलीतील तापमानाचा पारा आला १४ अशांवर

बदलापूरमध्ये सर्वात कमी ११.२ अंश सेल्सिअस तापमान

कल्याण डोंबिवली दि. २० नोव्हेंबर :
कल्याण डोंबवलीतील तापमानात गेल्या दोन दिवसांपासून चांगलीच घट झालेली पाहायला मिळत आहे. पहिल्यांदा १६ मग काल १५ आणि आज आणखी एक अंशाने कमी म्हणजेच १४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर बदलापूरमध्ये आज सर्वात कमी म्हणजेच ११.२ अंश सेल्सिअस तापमान नोंद झाल्याची माहिती हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी उपलब्ध करून दिली आहे.

गेल्या महिन्याच्या अखेरीस म्हणजेच दिवाळीच्या सुरुवातीलाच आलेल्या गारठ्याने कल्याण डोंबिवलीत गुलाबी थंडीची चाहूल लागली होती. मात्र तो आठवडा वगळता त्यानंतर मात्र अचानक हा गारठा काहीसा गायब झाला. आता दोन दिवसांपासून पुन्हा एकदा कल्याण डोंबिवलीत गुलाबी थंडीची चाहूल लागली असून दिवसागणिक तापमानाच्या पाऱ्यात एक एक अंशाने घट होत असल्याचे हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीवरून दिसत आहे. तर बदलापूरमध्ये सर्वात कमी म्हणजेच ११.२ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे.

यामुळे होतेय तापमानात घट…
उत्तरेतून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे आणि कमी झालेल्या आर्द्रतेमुळे किनाऱ्यापासून अंतर्गत भागात तापमानात घट होत असल्याचे खासगी हवामान अभ्यासक अभिजित मोडक यांनी सांगितले आहे. तसेच येत्या २,३ दिवस तापमान असेच राहणार असून त्यानंतर तापमानात वाढ होण्याचा अंदाजही मोडक यांनी व्यक्त केला आहे.

आज नोंदवण्यात आलेले किमान तापमान (२० नोव्हेंबर )

कल्याण – 14.2अंश सेल्सिअस
डोंबिवली – 14.8
उल्हासनगर – 13.6
बदलापूर – 11.2
कर्जत – 11.4
ठाणे – 16.8
नवी मुंबई – 17
मुंबई – 19.8
तलासरी – 11.8

मागील लेखशहर सौंदर्यीकरणाचे दृश्य परिणाम येत्या दहा दिवसात दिसणार – शहर अभियंता अर्जुन अहिरे
पुढील लेखकल्याण डोंबिवलीतील हिरकणींची पहिली सायकल स्पर्धा दिमाखात संपन्न

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा