Home ठळक बातम्या कल्याण शिळ मार्गावर पुन्हा एकदा जलवाहिनी फुटली ; अनेक गाड्या पडल्या बंद,...

कल्याण शिळ मार्गावर पुन्हा एकदा जलवाहिनी फुटली ; अनेक गाड्या पडल्या बंद, दुकाने आणि घरात शिरले पाणी

डोंबिवली दि. 28 मे :
कल्याण – शिळ मार्गावर असणाऱ्या काटई नाका परिसरात जलवाहिनी फुटण्याचा प्रकार काही केल्या थांबायचे नाव घेत नाहीये. आज संध्याकाळी पुन्हा एकदा भलीमोठी जलवाहिनी फुटून या भागात हाहाकार झालेला पाहायला मिळाला. पाईपलाईनचे पाणी संपूर्ण रस्त्यावर आल्याने अनेक गाड्या बंद पडल्या. तर अनेक दुकाने आणि घरांमध्येही पाणी शिरले. संपूर्ण कल्याण शिळ मार्गावर पाणी आल्याने दोन्ही बाजूकडील वाहतूक अक्षरशः ठप्प झाली होती.
काटई नाक्याजवळ एमआयडीसीची ग्रामीण भागाला पाणीपुरवठा करणारी १ हजार ७७२ व्यासाची ही मुख्य जलवाहिनी फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया गेले. मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागल्याने रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले. मात्र दुरुस्तीसाठी खूप वेळ लागणार आहे. यामुळे ठाणे शहर आणि कल्याण ग्रामीण भागात पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे. तर सतत फुटत असणाऱ्या या जलवाहिनीमूळे स्थानिक नागरिकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा