Home क्राइम वॉच डोंबिवलीत नामांकित व्यवसायिकाच्या बंगल्यात चोरी:सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंची लूट*

डोंबिवलीत नामांकित व्यवसायिकाच्या बंगल्यात चोरी:सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंची लूट*

डोंबिवली दि.12 डिसेंबर :
डोंबिवलीतील नामांकित उद्योगपती विजय पालकर यांच्या बंगल्यामध्ये आज पहाटे चोरीची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवली पूर्वेतील एमआयडीसीच्या मिलाप नगर परिसरात असणाऱ्या बंगल्यामध्ये हा प्रकार घडला आहे.

यामध्ये चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी बंगल्याबाहेरील सीसीटीव्हीची तोडफोड करून मग दरवाजाचा कडी कोयंडा उचकटून बंगल्यात बंगल्यात प्रवेश केला. पहाटेची वेळ असल्याने संपूर्ण पालकर कुटुंबिय गाढ झोपेत होते. बंगल्यात शिरल्यावर दरोडेखोरांनी सर्वप्रथम आतल्या रूमच्या बाहेरून कड्या लावल्या. जेणेकरून घरातील कोणती व्यक्ती बाहेर येऊ नये. त्यानंतर घरातील कपाटं आणि त्यातील तिजोरी फोडून त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने, चांदीची भांडी आदी ऐवज लुटून नेला.

 

विशेष म्हणजे हा प्रकार घडत असताना घरातील कुत्रा अजिबात ओरडला नाही त्याबाबत अधिक आश्चर्य व्यक्त होत आहे. तर घरातील नोकर राहत असणाऱ्या ठिकाणाला बाहेरून कडी लावण्यात आली होती. सकाळी पालकर कुटुंबिय उठल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. या घटनेने पालकर कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून घटनेचे गांभिर्य ओळखून मानपाडा पोलिसांसह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

*