Site icon LNN

“ये पब्लिक है सब जानती है” ; केडीएमसीच्या महापौरपदाच्या विषयावर खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांचा फिल्मीस्टाईल अंदाज

कल्याण पूर्वेतील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सवात खा. शिंदे यांचा जाहीर सत्कार

कल्याण दि.16 नोव्हेंबर :
कल्याण पूर्वात आयोजित विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती महोत्सव 2025 कार्यक्रमात लोकनेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा भव्य सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ज्ञान केंद्र आणि भव्य पुतळा उभारून कल्याणकरांचे अनेक वर्षांचे स्वप्न साकार केल्याबद्दल आयोजक मंडळातर्फे त्यांचा मानपत्र, शाल-श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. (“This is the public — they know everything!” MP Dr. Shrikant Shinde’s filmy-style remark on the issue of the KDMC Mayor’s post)

या भीम महोत्सवाला मोठ्या संख्येने नागरिक, आंबेडकरी अनुयायी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि स्थानिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान डॉ. शिंदे यांनी सामाजिक प्रबोधन, शिक्षणवाढ, तसेच डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा शहरात अधिक प्रभावी प्रचार-प्रसार करण्यासाठी पुढील काळातही विकासकामे सुरू राहतील, असे आश्वासन दिले.

आगामी होऊ घातलेले महानगरपालिकेच्या निवडणुकी बाबत राजकीय चर्चांनाही या कार्यक्रमात रंग मिळाला. विरोधकांच्या टीकेवर भाष्य करताना डॉ. शिंदे यांनी ये पब्लिक है, सब जानती है कुणीही काहीही बोलो, जनता जनार्दनच ठरवणार की महापौर कुणाचा बसणार,असा फिल्मी-स्टाईल टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्याला उपस्थितांकडून जोरदार प्रतिसाद मिळाला.

Exit mobile version