परंपरामध्ये यंदा रंगणार पंडित विवेक सोनार आणि उस्ताद फजल कुरेशी यांची मैफिल
कल्याण | २१ ऑगस्ट :
भारतीय शास्त्रीय संगीताची समृद्ध परंपरा जपत गुरु-शिष्य नात्यातील संस्कारांची वीण पुढील पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या कल्याणतील ‘गुरुकुल प्रतिष्ठान’तर्फे ‘परंपरा’ या बासरी वादन विशेष सांगीतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सुप्रसिद्ध बासरीवादक प्रशांत बनिया यांच्या मार्गदर्शनाखाली रंगणाऱ्या या मैफलीत प्रशांत बनिया यांचे ७० हून अधिक शिष्य आपली कला सादर करणार आहेत. (Three Generations, One Tradition: 70 Flute Players to Pay Musical Tribute to Their Gurus in Kalyan)
रविवार, ३० ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून कल्याण मधील के सी गांधी हायस्कूलच्या ऑडिटोरियममध्ये हा सोहळा रंगणार आहे.
या कार्यक्रमात बासरीवर राग व रागावर आधारित गाणी तसेच प्रशांत बनिया यांचे एकल बासरीवादक होणार आहे
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे प्रशांत बनिया यांचे गुरू विख्यात बासरीवादक पंडित विवेक सोनार यांची विशेष प्रस्तुती आणि त्यांना तबल्यावर साथ करणार आहेत प्रसिद्ध तबलावादक उस्ताद फजल कुरेशी.
तीन पिढ्यांच्या गुरु-शिष्य परंपरेतील नात्याचे विविध पैलू या कार्यक्रमातून उलगडणार आहेत. 3 पिढीतील ७० हुन अधिक बासरी बासरीवादक सिनेसंगीतांसह विविध रागांची सुरेल गुंफण यावेळी सादर करतील.
भारतीय शास्त्रीय संगीताची गुरुकुल परंपरा केवळ जपण्याबरोबर ती नव्या पिढीच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न या उपक्रमातून होत आहे. या कार्यक्रमामध्ये प्रवेश विनामूल्य असून संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सुरेल सोहळ्याचा आनंद घेण्याचे आवाहन गुरुकुल प्रतिष्ठानतर्फे करण्यात आले आहे.

