Home ठळक बातम्या राष्ट्रीय संगीत-नृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या नृत्य संघात तिघे कल्याणकर

राष्ट्रीय संगीत-नृत्य स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या महाराष्ट्राच्या नृत्य संघात तिघे कल्याणकर

 

नवी दिल्ली दि.27 सप्टेंबर :
केंद्र सरकारच्या अखिल भारतीय नागरी सेवा संगीत आणि नृत्य स्पर्धेत तिसरा क्रमांक मिळवलेल्या महाराष्ट्राच्या संघात कल्याणातील तिघा जणांचा समावेश आहे.
गेल्या आठवड्यात नवी दिल्लीत ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा झाली ज्यामध्ये देशभरातून स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेतील नृत्य विभागात महाराष्ट्राच्या संघाने चमकदार कामगिरी करत तिसरा क्रमांक पटकावला. या नृत्य संघामध्ये मोनाली स्वप्निल घोलप,अभिजित काटे आणि प्रियांका काटे या तिघा कल्याणकरांचा समावेश आहे. नागरी सनदी सेवा स्पर्धेत मिळवलेल्या या यशाबादल कल्याणातील स्पर्धकांसह महाराष्ट्राच्या संघावर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

मागील लेखकेडीएमसीतर्फे कल्याण डोंबिवलीत उद्या (27 सप्टेंबर) 30 ठिकाणी लसीकरण
पुढील लेख…नाहीतर बीएसयूपी इमारतीत घुसून घरं ताब्यात घेऊ – शिवसेना आणि काँग्रेसचा इशारा

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा