Home ठळक बातम्या डोंबिवलीत भीमपहाटच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आगळी मानवंदना

डोंबिवलीत भीमपहाटच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आगळी मानवंदना

 

डोंबिवली दि. 14 एप्रिल :
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे यंदा प्रथमच भीमपहाट या आगळ्या वेगळ्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे डोंबिवलीत आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सादर झालेल्या गाण्यांतून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनप्रवास मांडण्यात आला.

डोंबिवली शहर शिवसेना शाखेतर्फे डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौकात अरविंद मोहिते यांच्या धम्मपद एक धम्मदेसना या प्रबोधनात्मक वाद्यवृंदाचे आयोजन करण्यात आले होते. याद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांचा जीवनपट विविध गाण्यांतून उलगडण्यात आला.

तसेच खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, शहरप्रमुख राजेश मोरे, नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी या मान्यवरांच्या हस्ते सामाजिक कार्य करणारे प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड यांना डोंबिवली भीमरत्न पुरस्कार देण्यात आला. सामाजिक कार्यात उल्लेखनीय काम करणारे दिपश्याम बेढेकर आणि केडीएमसीच्या उपअभियंता रोहीणी लोकरे, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या अर्चना मोहिते, राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे के. आर. सरकटे, क्रीडा क्षेत्रात काम करणारे निलेश शिंदे यांच्यासह पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या प्रशांत माने, भाग्यश्री प्रधान आणि सुभाष पटनाईक यांनाही यावेळी गौरविण्यात आले. यावेळी पुष्पगुच्छ न देता सत्कारमूर्तींना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले.

तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदिरा चौकातील पूर्णाकृती पुतळ्याला डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपजिल्हा प्रमुख सदानंद थरवळ, राजेश कदम, तात्या माने, रणजीत जोशी, नितीन पाटील, रवी पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

मागील लेख‘सिम्बॉल ऑफ नॉलेज’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 2 हजार 51 वह्यांच्या माध्यमातून अनोखी मानवंदना
पुढील लेखकल्याणात भरलेय स्थानिक 15 कलाकारांचे अनोखे कला प्रदर्शन

तुमची प्रतिक्रिया लिहा

तुमची कंमेंट लिहा
तुमचे नाव लिहा